मुख्य बातमी

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये (रत्नागिरी शहर) मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये (रत्नागिरी शहर) श्री विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिनाचे औचित्य साधून या दिवसाचा संपूर्ण परिपाठ व प्रार्थना मराठी मधून सादर करण्यात आली. प्रार्थना गीत म्हणून ‘पसायदान’ लावण्यात आले. कवी, नाटककार कुसुमाग्रज यांच्या बद्दल माहिती तसेच मराठी भाषेचे महत्व याबद्दल आपले विचार साची जाधव हिने (इ. आठवी) व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी मराठीमधील अनेक दिग्गज लोकांची वेशभूषा केली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी ‘लाभले आम्हास भाग्य’ हे गीत लावण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग शिक्षक व विद्यार्थी यांनी केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!