मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी जि. प. प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दीप्ती पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर तंटामुक्त समिती अध्यक्ष रूपेश कुरतडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. या प्रसंगी बोलताना दिलीप गुरव (शाळा संस्थापक) यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीच्या चढत्या आलेखाबाबत समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक प्रगतीबाबत मुख्याध्यापक मसरज शेख व सहशिक्षक श्री. सावंत यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सत्यश्री खर्डे (अंगणवाडी सेविका), सौ. स्नेहा कुरतडकर (मदतनीस), ओंकार खोत, शैलेश कुरतडकर (पोलिस पाटील), सौ. अदिती गुरव, प्रसाद मेस्त्री, मनोज खर्डे, धीरज गुरव, प्रवीण नागवेकर, मनोज खर्डे, अक्षय गुरव, श्रीमती शारदा गुरव, संकेत गुरव, संदीप गोठणकर, अमोल कोंडवे, सुनीता कुरतडकर (माजी सरपंच), दिगंबर गोठणकर, सौ. सृष्टी पेटकर, शैलेश खर्डे, नरेंद्र खर्डे, नीलेश म्हादये यांनी सहकार्य केले.

रंगमंच व्यवस्था नवलादेवी देवस्थान यांनी उपलब्ध केल्यामुळे मुख्याध्यापक मसरज शेख यांनी सर्व ग्रामस्थांचे व उपस्थितांचे आभार मानले आणि सर्व मुलांची रंगभूषा, वेशभूषा रवींद्र मेस्त्री यांनी केल्याबद्दल तसेच स्वप्नील नागवेकर यांनी ध्वज संकलन केल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने श्री. सावंत यांनी आभार मानले.


