व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वाद थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात

रत्नागिरी : सध्या सुरू असलेल्या व्यावसायिक गॅस टंचाई टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरणाच्या वादातून रत्नागिरी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल (१६ मार्च) व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण करताना कर्मचाऱ्यांनी ५ सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा कंपनी व्यवस्थापनाचा आरोप आहे. गोडाऊन किपरने पाच व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध पद्धतीने विक्री केल्याचा गॅस एजन्सीचा आरोप यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे; मात्र आम्ही पावतीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण केले, या आपल्या म्हणण्यावर कर्मचारी ठाम असल्याने हा १४ कर्मचाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजल्यापासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान, रत्नागिरी गॅस एजन्सीचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये पोलिसांसमोर चर्चेला सुरुवात झाली. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी सर्व कर्मचारी रत्नागिरी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित होते.



