मुख्य बातमी
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त २० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा आणि १० वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. दुपारी १२.३० वाजता आरती झाल्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ७.३० वाजता आरती झाल्यानंतर ८ वाजता महाप्रसाद दिला जाईल.
यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.



