महाराष्ट्रमुख्य बातमी

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवताना रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, मत्स्यव्यवसाय सचिव एन.रामास्वामी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकारी (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती मच्छिमारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून याची अंमलबजावणी गतीने करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. तसेच मिरकरवाडा टप्पा ३ च्या कामासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मरीन क्लस्टर प्लॅन तयार करून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्याचेही निर्देशही यावेळी मंत्री राणे यांनी दिले. यासोबतच मिरकरवाडा बंदरातील जुन्या बोटी हटवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरे विभागाच्या विविध कामांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ उपसा करण्यासंदर्भात देखील यावेळी सविस्तर चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!