क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लांजात ४ एप्रिल रोजी मिनी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

लांजा : येथील जाणता राजा ग्रुपच्या वतीने आमदार किरण सामंत पुरस्कृत भव्य मिनी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन ४ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी ६ वाजता श्रीगणेश मंगल कार्यालयाजवळ (आग्रे हॉल), जावडे रोड, सारस्वत वसाहत, लांजा येथे होईल.

स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांस अनुक्रमे १५,५५५ रुपये, ११,१११ रुपये, ७,७७७ रुपये आणि ३,३३३ रुपये व प्रत्येकी आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे बेस्ट डिगरसाठी रोख ५०० रुपये व चषक, शूटरसाठी रोख ५०० रुपये व चषक, नेटमनसाठी रोख ५०० रुपये व आकर्षक चषक दिला जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये शुल्क असून, सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. चिठ्ठ्या टाकून सामने खेळविण्यात येणार आहेत. सहा वाजता उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवेश फी माफ करण्यात येईल. जास्तीत जास्त संघांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंगेश लांजेकर (९४२३२९६८३०), संजय चव्हाण (९०४९३९७०५१), मकरंद लिंगायत (८००८४२८७३०/८४४६१४७६७७) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!