देव, घैसास, कीर महाविद्यालयात तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपशिक्षणधिकारी नरेंद्र गावंड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःबरोबरच महाविद्यालयाचे व पालकांचे नाव उज्ज्व्ल व उंच करा, असा सल्ला दिला. प्रास्ताविक परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी केले. तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिन्ही शाखांच्या वर्गशिक्षकांनी व उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून महाविद्यालयाला माईक व स्पीकर भेटवस्तू स्वरूपात दिला. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमिषा मडके व ईश्वरी पवार यांनी केले. आकाश रनसे याने आभार मानले.



