नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्याकडून माणुसकीचे दर्शन
उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना सरबत वाटप

रत्नागिरी : शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम सुरू असताना खडतर उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेत नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांनी माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच मिऱ्या–नागपूर हायवेवरील कामगार उन्हाच्या कडक झळा सहन करत आपले कर्तव्य पार पाडत असताना, सौ. कुळकर्णी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सरबत देऊन त्यांच्या श्रमांचे कौतुक केले आणि त्यांना दिलासा दिला.
या छोट्याशा पण हृदयस्पर्शी कृतीमुळे कामगारांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांकडूनही या कृतीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. अशा प्रकारे जनतेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे उदाहरण खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे. सेवा आणि संवेदनशीलता यांचा सुंदर संगम साधणाऱ्या सौ. मेधा कुळकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.



