मुख्य बातमी

खेडमध्ये संतोष साखरे यांचा जनता दरबार संपन्न

खेड : भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथील शासकीय विश्रामगृहात आज जनता दरबार संपन्न झाला.

खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्या अडचणी राज्य शासनापर्यंत पोहोचाव्यात, याच हेतूने हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, हेच माझा उद्दिष्ट आहे. तसेच या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न होता. यापुढेही असे उपक्रम राबवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आपला विश्वास, आपले प्रेम आणि आपला पाठिंबा याच बळावर जनसेवेचा हा प्रवास पुढेही अधिक जबाबदारीने सुरू ठेवणार, ते म्हणाले.

याप्रसंगी भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा अल्पसंख्यांक खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा सोशल प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता, तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!