मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये २ मे रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा २ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता नावनोंदणीने मेळाव्याची सुरुवात होईल.
त्यानंतर “असा मी घडलो” या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी व शिक्षकांची मनोगते व्यक्त होणार आहेत. दुपारच्या भोजनानंतर गप्पाटप्पा, मनोरंजक खेळ , माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध प्रकारे हा मेळावा संपन्न होणार आहे. शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शनिवारी (२ मे) माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी संघाचे सदस्य रणजीत सुवारे, सुदेश निवळकर, अभिजीत गोडबोले, योगेश कोरगावकर, आकाश परीट, प्रणित मेस्त्री, अक्षय पाखरे, अनिकेत जाधव, अच्युत गजबिये, आलीशा जाधव, रिया मांडवकर, शाकिब मुल्ला, सुशांत पवार, जीवन जाधव, प्रकाश पालकर यांनी केले आहे.



