आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.५५ टक्के

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.५५ टक्के लागला आहे.
या परीक्षेसाठी एकूण ४५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने ८८.८० टक्के गुण मिळवून आबलोली विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर गार्गी उल्हास काळे हिने ८६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर अनुष्का शिवाजी भोसले हिने ८६ टक्के गुण मिळवून तसेच कुमार साईराज शेखर अलीम याने ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी गिरी, लोक शिक्षण मंडळ आबलोली या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत आणि संचालक मंडळाच्या सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



