कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

रत्नागिरी : शहराजवळील कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूल रत्नागिरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून गेल्या दहा वर्षांची उज्वल यशाची परंपरा शाळेने कायम राखली आहे.
या परीक्षेसाठी शाळेतून ८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६६ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ०३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
अन्वयी अमित कदम हिने ९७.४० टक्के गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. समृद्धी चव्हाण हिने ९५.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रेहान वसीम नाईक हा ९५.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जाॅर्ज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



