मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, माधवबाग चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर नुकतेच कुटगिरी (ता. गुहागर) येथे उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले.

यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, आमदारांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे, वेळणेश्वर गटाच्या विभागप्रमुख सौ. सिद्धी रामगडे, डॉ. सौरभ सुर्वे आणि टीम, कुटगिरी गावचे पोलीस पाटील सुधाकर खेतले, तंटामुक्ती अध्यक्ष आयु. विजय कदम, चिपळूण रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष दिलिप खेतले, सैनिक हेमंत खेतले, भाई सपकाळ, पाभरे गावचे समाजसेवक काशिराम पाष्टे, विजय घडशी, प्रतिष्ठानचे जेष्ठ सल्लागार दत्ताराम डिंगणकर, अर्जुन आगरे, पीएसआय प्रकाश खेतले , पाभरे गावचे समाजसेवक अशोक बागकर, तंटामुक्ती अध्यक्षा सौ. जोस्त्ना कातळकर, कुटगिरी गावचे अध्यक्ष मनोहरज खेतले, गावठण तरुण विकास मंडळ वाडी अध्यक्ष मंगेश खेतले, शंभर मारुती खेतले, विनय कातळकर, सीताराम खेतले, माजी उपसरपंच सुरेश खेतले, विठोबा नाना खेतले, ह.भ.प.सुभाष महाराज जाधव, कुटगिरी गावचे शाखा प्रमुख अरविंद खेतले, चारुदत्त सावंत, संतोष खाकम, चंद्रकांत खाकम, महादेव खाकम, काशिराम डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणी, नाडी परीक्षण, आहार व व्यायाम विषयक सल्ला, रँडम ब्लड शुगर, SPO2, बॉडी मास इंडेक्स, निशुल्क ईसीजी तपासणी, फुफुसाची कार्यक्षमता तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. १५० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप तुकाराम खेतले यांना महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२६ जाहीर झाल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी डॉ. यतीन जाधव यांचाही गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले, अमोल खेतले,सुरज हुमणे, ओम वीर, मंदार हुमणे, शिशिर खेतले, गणेश जाधव, रोहित सावंत,लक्ष खाकम, दुर्वेश खाकम, कुणाल खाकम खुप मेहनत घेतली. शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!