मुख्य बातमी
कोळंबे (रत्नागिरी) येथे रील बघताना मोबाईलचा स्फोट; तरुण जखमी

रत्नागिरी : मोबाईलवर रील बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट होऊन सुशील सुनील रहाटे (वय ३५, रा. कोळंबे, रत्नागिरी) हा तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास फिनोलेक्स फाटा ते कोळंबे गाव दरम्यान रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशील रहाटे यांचे फिनोलेक्स फाटा येथे गॅरेज आहे. गॅरेजमधील काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास ते चालत आपल्या कोळंबे गावी जात होते. चालताना मोबाईलवरील रिल बघत असताना त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. हातातील मोबाईल खाली पडला. मात्र तयात त्यांच्या बोटांना दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.



