मुख्य बातमी
अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या संपात जिल्ह्यातील मेडिकल दुकानदार सहभागी

रत्नागिरी : सरकारने होम डिलिव्हरीसाठी विशेष सूट दिली आहे. त्यावर अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा आक्षेप असून, ऑनलाइन औषध विक्रीविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील ७५० मेडिकल आज बंद राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली.
आज (२० मे) २४ तासांसाठी हा बंद पुकारण्यात आला असून, यात रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील चार हजार मेडिकल दुकानदारांचा सहभाग आहे.

