मुख्य बातमी

मेर्वी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, सौ. भारती तायशेट्ये आदी शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीर निरोगी तंदुरुस्त राहते मन प्रसन्न राहते. योगासने आणि प्राणायाम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खूप महत्त्वाचे आहे. योगासने प्राणायाम केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात यश लाभते विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते त्यामुळे सर्वांनीच योगासने आणि प्राणायाम करणे आजच्या काळाची गरज असल्याचे शिक्षकांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. (छाया : दिनेश पेटकर, गावखडी)

निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दररोज सर्वांनी योगाभ्यास केला पाहिजे असा संकल्प मेर्वी शाळेत आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगाचे प्रकार प्रात्यक्षिके सादरीकरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!