मुख्य बातमी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे कृषी दिन उत्साहात 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वीतील विद्यार्थ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधत मेर्वी गुरववाडी भात शेतीचे प्रात्यक्षिक अनुभवले.

शाळेचे मुख्याध्यापक मसरज शेख आणि सहशिक्षिका शानजा भाटकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शेती मशागत यशस्वी करून, भाताचे रोपांची लावणी केली. शेतीविषयी केवळ माहिती न सांगता विद्यार्थ्यांनी शेतात उतरून प्रत्यक्ष लावणीचा अनुभव घेतला, शाळेच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक संघ, ग्रामस्थ, शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले.

मेर्वी जि. प. प्राथमिक शाळा गुरववाडी येथे प्रत्यक्ष लावणी करताना विद्यार्थी. (फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!