आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बालजगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा मुसळे यांची मुलाखत

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बाल जगत’ या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळे यांची मुलाखत उद्या (१२ जुलै) सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. यात भरतनाट्यमच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करणाऱ्या स्वरा मुसळे यांच्या भरतनाट्यम प्रवासाविषयी सोनाली सावंत यांनी संवाद साधला आहे.
या मुलाखतीत स्वरा यांनी भरतनाट्यमची आवड कशी निर्माण झाली, नृत्य शिक्षणाचा प्रवास, नियमित सरावाचे महत्त्व, विविध सादरीकरणांचे अनुभव तसेच शास्त्रीय नृत्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला कशी मदत होते, याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. शास्त्रीय नृत्याची आवड असलेल्या बालमित्रांसह पालकांसाठीही हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफ. एम. १०१.५ मेगाहर्ट्झ, Newsonair या लाईव्ह मोबाईल ॲपवर तसेच YouTube – airratnagiri1248 आणि Facebook/Instagram – @airratnagiri वरही ऐकता येणार आहे.



