मुख्य बातमी
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात २५ जुलै रोजी दीक्षांत समारंभ

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयामधून (स्वायत्त) मार्च / एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपातील विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्याला संस्थेच्या वतीने सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.


