क्रीडामुख्य बातमी

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे जिल्हास्तरीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा

रत्नागिरी : दरवर्षी २० जुलै हा दिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी २० जुलै १९२४ रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली होती. यंदा FIDE च्या स्थापनेला १०२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने खुल्या जिल्हास्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १९ जुलै रोजी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलच्या रंजन मंदिर सभागृहात होणार आहे.

स्पर्धेतील सर्व खेळाडूंनी सकाळी १० वाजता स्पर्धास्थानी हजर राहणे आवश्यक आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जलद बुद्धिबळ नियमांनुसार स्पर्धा खेळविण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रत्येकी १० मिनिटे + ५ सेकंद इन्क्रिमेंट असे वेळेचे नियंत्रण राहील. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने होणार असून, सहभागी खेळाडूंच्या संख्येनुसार फेऱ्यांची संख्या निश्चित करण्यात येईल.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास रु. ५ हजार व चषक , द्वितीय क्रमांकास रु. ३ हजार व चषक , तृतीय क्रमांकास रु. २ हजार व चषक , तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत प्रत्येकास रु. १ हजार रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय ७ वर्षांखालील, ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, महिला, वरिष्ठ (५०+) तसेच दिव्यांग गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक चषक प्रदान करण्यात येतील.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट डॉ. संदीप करे यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून रोटे. जयेश दिवाणी (9960649333) तर स्पर्धा समन्वयक म्हणून रोटे. अमर आयरे (8080615608) कार्यरत आहेत.

स्पर्धेत नाव नोंदणीची अंतिम मुदत १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. नावनोंदणी फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाईल. नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या विवेक सोहनी (९४२२४७४५४६), चैतन्य भिडे (८०८७२२००६७) , मंगेश मोडक (९४०५३५२३५६) यांच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!