मुख्य बातमी
अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ष आजपासून सुरू होणार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी वर्गाचे शैक्षणिक कामकाज आजपासून (१५ जुलै) दुपारी १२.३० ते सायंकाळी ०५.३० या कालावधीत सुरू होत आहे.
विज्ञान शाखेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीस लागून असलेल्या खातू नाट्य मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीत उपस्थित राहावे, तर वाणिज्य आणि कला शाखेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य इमारत येथे उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी केले आहे.



