मुख्य बातमी
टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे महाआरोग्य शिबिर

रत्नागिरी : श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा टिळक आळी गणेशोत्सवाचे १०१ वे वर्ष आहे. यामध्ये नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच यावेळी डोळे तपासणी, रक्त तपासणी (सी.बी.सी. / शुगर रँडम / क्रिएटीन /युरीक लॅसिड / पल्मोनरी फंक्शन टेस्ट), हाडांची तपासणी (बोन डेन्सिटी टेस्ट) होणार आहे.
हे शिबिर ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता टिळक स्मारक, उत्सव मंडपाशेजारी, टिळक आळी, रत्नागिरी येथे होणार असून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.



