मुख्य बातमी

कै. मालतीबाई जोशी विद्यामंदिरमध्ये शिक्षक दिन उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. मालतीबाई जोशी विद्यामंदिरात शिक्षक दिनी विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक विलास पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक बनलेले आजचे विद्यार्थी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गवार जाऊन आपापले विषय अतिशय छान पद्धतीने शिकवले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाचे शैक्षणिक साहित्य स्वतः बनवून आणले होते. यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, चित्रकला, शारीरिक शिक्षण असे विविध विषय विद्यार्थ्यांनी शिकवले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेतला.

काही विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून तर कोणी मुख्याध्यापक म्हणून व कोणी शिपाई म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांची तयारी पाहून शिक्षकांनाही आनंद वाटला. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांसाठी बनवून आणलेली भेटकार्ड वर्ग शिक्षकांना दिली. शाळेच्या विभागप्रमुख सौ. संजना तारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!