मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून येणाऱ्या कोकण वासीयांसाठी चहा-नाश्त्याची मोफत सुविधा

मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका (खेड) येथे भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने उपक्रम

खेड : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर अपोलो टायर्स-भरणे नाका, खेड येथे गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या कोकणवासीय गणेश भक्तांच्या सेवेसाठी भाजपा युवा मोर्चा खेड यांच्या तर्फे मोफत चहा- नाश्त्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून आपल्या गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान चहा-नाश्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगरपालिकेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संदेश भुवड, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, महेश मुंडेकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!