मुख्य बातमी
टिळक आळी गणेशोत्सवात आनंद भाटे यांची संगीत मैफल

रत्नागिरी : शहरातील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात ज्येष्ठ गायक ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे यांच्या भक्ती संगीत व नाट्य संगीताची मैफल आयोजित केली आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता हा कार्यक्रम टिळक आळी गणेशोत्सव मंडप येथे होणार आहे.
या कार्यक्रमात आनंद भाटे यांना रामकृष्ण करंबेळकर तबलासाथ, सुश्रूत चितळे तालवाद्यसाथ, तर टिळक आळीतीलच उदयोन्मुख कलाकार वरद सोहनी संवादिनी साथ करणार आहेत. या संगीत मैफिलीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळाने केले आहे.



