भातगाव-गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील भातगाव – गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या सुचिता घाणेकर-गोताड, सरपंच रेणुका आग्रे, विजय मोहिते, सागर काजरोळकर, विशाल गोताड, दीपक जाधव, आशिष डिंगणकर, अनंत डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या, बँजो पार्टीच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मान्यवरांना कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते फित कापून व सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भातगाव गोळेवाडीतील अनंत आग्रे, महादेव आग्रे, अनंत दामोदर आग्रे, मनोहर आग्रे, गोपीनाथ गावडे, गंगाराम आग्रे, शंकर आग्रे, नामदेव आग्रे, शंकर गावडे, अनंत आग्रे, बाळू डिंगणकर, मालू सोलकर, रघुनाथ गावडे, रवींद्र गावडे, लक्ष्मण आग्रे, दिलीप मते, शंकर डिंगणकर, कृष्णा सोलकर, जानू सोलकर, कृष्णा आग्रे, दामोदर आग्रे, माजी सरपंच रवी पवार, संतोष आग्रे, मुरली आग्रे, सिद्धोधन मोहिते आदी कार्यकर्त्यांसह जागा मालक, गावकरी, मानकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डिंगणकर यांनी केले, तर अनंत गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.



