मुख्य बातमी

जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीम

२२ व २४ सप्टेंबर रोजी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी समिती कार्यालयाशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

विशेषतः नीट (NEET), सीईटी (CET), क्लॅट (CLAT), जेईई (JEE) यांसारख्या व्यावसायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे विशेष नियोजन करण्यात आले आहे:

त्रुटी पूर्ततेचे दिवस: २२ सप्टेंबर २०२६ आणि २४ सप्टेंबर २०२६.

आवश्यक बाबी: संबंधित विद्यार्थ्यांनी (किंवा त्यांच्या पालकांनी) सर्व मूळ कागदपत्रांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

कालावधी: अन्य सर्व अर्जदारांनाही १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत समिती कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अर्जातील त्रुटी दूर करता येतील.

बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी समितीमार्फत शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिरे घेऊन प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जातात. चालू शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश परीक्षा दिल्या आहेत; परंतु अद्याप जात वैधता पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी प्रवेश प्रक्रियेतील अडचण टाळण्यासाठी तात्काळ अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!