मुख्य बातमी
वाटद पंचक्रोशीत ऐन गणपती सणात महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद पंचक्रोशीत ऋतू कोणताही असो विजेचा लपंडाव नेहमीच सुरू असतो. सध्या घरोघरी गणरायाचे आगमन झाले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे; मात्र सणासुदीच्या दिवसातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरण विभागाबाबत जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाटद पंचक्रोशीत सतत वीज ये-जा असा प्रकार सुरू आहे. नागरिकांकडून सतत पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्याने जनतेत नाराजी पसरली आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन वीजपुरवठा नियमित सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी जनतेची आहे.

