तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात शब्दवेध अभिवाचन, निबंध स्पर्धेला प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माळनाका येथील श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘शब्दवेध’ अभिवाचन व निबंध स्पर्धेला विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. दत्तात्रय वालावलकर उपस्थित होते.
अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण सौ. मधुरा लाकडे, सौ. रसिका सहस्रबुद्धे यांनी केले. निबंध स्पर्धेचे परीक्षण अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक अभिजीत भिडे यांनी केले. बक्षीस वितरणावेळी परीक्षक सौ. मधुरा लाकडे यांनी अभिवाचन करताना शब्दांचे स्पष्ट उच्चार, योग्य आवाजातील चढ-उतार, विरामचिन्हांचा योग्य वापर, भावपूर्ण सादरीकरण आणि आशयाची समज यांना महत्त्व असते, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सूत्रसंचालन सौ. पोतकर यांनी केले.
या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि भाजप पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर यांचे योगदान लाभले. तसेच आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पवार, पर्यवेक्षिका सौ. कांबळे, विभागप्रमुख सौ. दीप्ती पंडित यांनी सहकार्य केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
अभिवाचन स्पर्धा- गट १- प्रथम- रमा कानविंदे (पटवर्धन हायस्कूल), द्वितीय- शल्वी शिवगण (जी. जी. पी. एस.), तृतीय- श्रेया वाडकर व अत्रेय देवस्थळी (रा. भा. शिर्के प्रशाला). गट २- प्रथम- बिल्वा रानडे (फाटक ज्युनिअर कॉलेज), द्वितीय- आर्या फणसळकर, अर्पिता बापट आणि राधा पाटणकर (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय- आकांक्षा सप्रे, शताक्षी भुर्के आणि पूर्वा जोशी (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय).
निबंध स्पर्धा- गट १- प्रथम- तनया पांचाळ (इयत्ता दहावी, र. न. प. शाळा क्रमांक १५, दामले विद्यालय), द्वितीय- अथर्व पांचाळ (इयत्ता दहावी, श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, खेडशी), तृतीय- अनुष्का पाथरे (इयत्ता नववी, र. न. प. शाळा क्रमांक १५, दामले विद्यालय). गट २- प्रथम- गायत्री किनरे (इयत्ता बारावी, पटवर्धन ज्युनिअर कॉलेज), द्वितीय- प्रेरणा भोजने (इयत्ता अकरावी, अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय- तन्मय भरणकर (इयत्ता बारावी, एस. एम. बी. टी. ज्युनिअर कॉलेज).


