राजापुरात १६ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा

राजापूर : दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा कडाका, व खालावलेली भुगर्भातील पाणी पातळी यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील साहेबाच्या धरणात खडखडाट झाल्याने बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५ पासुन शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय राजापूर नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे . त्यामुळे यावर्षी पुन्हा राजापूरवासियांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.
राजापूर शहराला लगतच्या कोदवली येथील इंग्रजकालीन साहेबाच्या धरणातुन पाणी पुरवठा करण्यात येतो . साहेबाच्या धरणातुन येणारे पाणी हे ग्रॅव्हिटी फोर्स ने येत असल्याने वर्षातले आठ ते दहा महिने राजापूर नगर परिषदेला पाणी खेचण्यासाठी खर्च करावा लागत नाही; मात्र गेल्या काही वर्षात साहेबाचे धरण गाळाने भरल्याने साधारण मार्च एप्रिल पाणी राजापूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो . या टंचाई काळात शहरालगतच्या शीळ जॅकवेलवरुन पाणी खेचण्यासाठी लाखो रुपये खरच करावे लागतात . त्यातच पाणी करातुन येणारी रक्कम व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शहरवासियाना पाणी पुर्वठा करताना राजापूर नगर परिषद दरवर्षी लाखोरुपये तोट्यातच असते.
साहेबाच्या धरणाच्या खालच्याबाजुस नवीन धरणाला मंजुरी मिळाली असुन नीधी अभावी ते काम अर्धवट आहे मात्र उर्वरीत कामासाठीही शासनाने निधी मंजुर केला असुन पुढील कामाची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. १६ एप्रिलपासून १६, १८, २०, २२ याप्रमाणे शहरात पाणी पुरवठा चालू राहील, अशी माहिती राजापूर नगर परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
चव्हाणवाडी विभाग
रुमडेवाडी, शेट्ये, धालवलकरघाटी, भटाळी वेदशाळा, पंचायत समिती, गोरुले लाईन, कोर्टापासून आंबेडकर वस्तीगृह पर्यंत, यश अपार्टमेंट, टेलिफोन एक्सेंज, खडपेवाडी, जवाहरचौक, भटाळी, मुल्लावठार, झरीलाईन खान, खलिफे वगैरे काझी, चव्हाणवाडी, परिटघाटी, व्यायामशाळा.
बाजारपेठ विभाग
भोगटे लाईन, आशियान बोल, कुडाळकर लाईन, नाखवा, खतीब, संत रोहिदासवाडी, बौध्दवाडी, वरचीपेठ, मापारीलाईन मुन्शी नाका ते जवाहरचौक, बाजारपेठ मिरजकर घाटी, सनामुल्ला, मुन्शीनाका ते लोकमान्य हॉटेल मिरजकर बिल्डींग विचारे लाईन, डॉ. बावकर, पारकर वगैरे, लिगम घाटी, बारगीर, रेस्ट हाऊस, कातारी, मांजरेकरघाटी, जावकरघाटी, बक्कर लाईन, बाकाळकर लाईन, साईनगर पुनर्वसन विभाग, सनम लाईन, प्रियदर्शनी नं. २ (मेखी गुरव वगैरे)
रानतळे विभाग
मुजावर, मुल्ला मास्तर रेवाळे दुकानापर्यंत १७ एप्रिलपासून १७, १९, २१ याप्रमाणे चालू राहील
कोंडेतड विभाग
बारगीर, काशी, सातकुट घाटी मोकाशी लाईन, कोंडकर लाईन पर्यंत, वाडीवाले, हवालदार लाईन, मुजावर लाईन, भंडारवाडी, बौध्दवाडी, कुर्ले वठार, कुवेसकर, काझी घरापर्यंत.
तालीमखाना पंप हाऊस/पेट्रोलपंप गुरववाडी, रॉयल कॉम्प्लेक्स, चौगुले रेसीडेन्सी इ. रॉयल बिल्डींग, चौगुले रेसीडेन्सी, मालीम बिल्डींग, बंगलवाडी गुरववाडी, एस. टी. डेपो, तांबळ गुरववाडी इ. प्रियदर्शनी वसाहत नं. १, एस. टी. डेपो, तांबळ गुरववाडी बंगलवाड़ी गुरववाडी, एसटी डेपो खालील गुरववाडी, भाई जाधव, कोर्ट, कचेरी लाईन, पोस्ट, बावधनकर, चौगुले, गवळी, पवार, काझी वैगेरे.
धोपेश्वरघाटी, दिवटेवाडी, खडपेवाडी विभाग
तांबेलाईन, आरेकर, पवार, डंबे / शिंदे लाईन, लांजेकर, मांडवकर लाईन, दिवटेलाईन, वाणेपार, गार्डी, राडी, लांजेकर, वादक, दुदम, सोगमलाईन, परांजपे वगैरे साखळकर भंडारवाडी लाईन. १ (२ साखळकरवाडी लाईन)
(रहाटे घाटी, पाटकर घाटी, खडपेवाडी), खडपेवाडी / दातारप्रेस / गुजराळी, बागकाली, भावेवाडा, धुमक लाईन, गोंडाळ लाईन, खालची ओगलेवाडी, वरची ओगलेवाडी, रानतळे विभाग गोंडाळ, बावधनकर, साखळकर/ कोळेकर, मांजरेकर व इतर.
रानतळे विभाग
गोंडाळ, बावधनकर, साखळकर/कोळेकर, मांजरेकर व इतर आंबेवाडी दि.१७ एप्रिल एप्रिल पासून १७,१९,२१ याप्रमाणे चालू राहील.
ज्या ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यास, त्या भागातील पाणी पुरवड्याच्या वेळात बदल होऊ शकेल, अशी माहितीही या प्रसिध्दी पत्रकाद्वारे राजापूर नगर पालिकेने दिली आहे.



