बळीराज सेना गुहागर तालुका पदाधिकारी यांची बैठक उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका बळीराज सेनेच्या विशेष पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शृंगारतळी येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी उत्साहात झाली.
या बैठकीला जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते, तालुका अध्यक्ष अरुण भुवड, उपाध्यक्ष संतोष पास्टे,विधानसभा महिला आघाडी प्रमुख एश्वर्या कातकर, तालुका महिला आघाडी प्रमुख स्वप्नाली डावल, तालुका महिला सचिव स्वेतांबरी मोहिते, उपाध्यक्ष श्रावणी शिंदे, तळी शहर अध्यक्ष सुभाष रजपूत, कार्यकारणी सदस्य विनायक घाणेकर, अंजनवेल विभाग प्रमुख अशोक रावणंग, महिला आघाडी अध्यक्ष सौ. कातकर, डावल, तालुका सचिव सौ. मोहिते यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते.
बळीराज सेनेव्या पुढील वाटचालीबाबत वरिष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करून सामाजिक राजकीय तसेच शासकीय विकास कामांचा आढावा घेतला व पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यानजन संपर्क कार्यालय प्रमुख म्हणून तळी शहर अध्यक्ष सुभाष रजपूत यांची निवड करण्यात आली. जनतेच्या कामासाठी भेटण्याची वेळ सकाळी ११ ते २ अशी असून, नागरिकांनी या वेळेत भेटावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीला तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते, जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. सर्व प्रथम दिवंगत नेते नंदकुमार मोहिते तसेच सीमेवरील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


