मनसे गुहागरच्या वतीने पहलगाम येथील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण

आबलोली (संदेश कदम) : जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची निघृण हत्या केली. यामध्ये अनेक पर्यटकांना त्यांनी जखमी केले. ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा संपूर्ण देशामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी शृंगारतळी येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयासमोर पेहलगाम येथील मृत पावलेल्या नागरिकांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून बाहेर येण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व गुहागर तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर शब्दात निषेध करत आहोत, काश्मीरमध्ये येणारे पर्यटक आणि हिंदू बांधव यांना पूर्णतः सुरक्षितेची जाणीव व्हावी अशी कडकं कारवाई सरकारने करावी. यावेळी दहशतवाद्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदिप मांडवकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे, शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्टे, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, राहुल जाधव, प्रसाद विखांरे, रमेश जोशी, विश्वजीत पोदार, सुमित पवार, विकास जोयशी, यश पालशेतकर, सतोश खाबे, मच्छिंद्र पडवळ, सुयोग्य कुबडे, विजय शिंदे, विवेक जानवळकर आदी उपस्थित होते.


