वीर जवान एम. मुरली नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आंध्र प्रदेशमधील नाईक ह्यांच्या मूळ गावी मंत्री उदय सामंत ह्यांनी नाईक कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : भारतमातेच्या रक्षणासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना घाटकोपर, कामराज नगर येथील वीर जवान एम. मुरली नाईक यांनी आपले प्राण अर्पण करत वीरमरण पत्करले. आज त्यांच्या आंध्रप्रदेशमधील मूळ गावी महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी भेट देत नाईक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

या वेळी उदय सामंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वीर जवान मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद घडवून आणला.

वीर जवान मुरली नाईक यांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करत, त्यांचे शौर्य अविस्मरणीय ठरेल यासाठी मुंबईत त्यांच्या पुतळ्याची उभारणी केली जाईल, असा सन्मानाचा शब्द यावेळी उदय सामंत यांनी नाईक कुटुंबियांना दिला.



