अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास मनसे आक्रमक भूमिका घेणार : उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर
शृंगारतळी येथे हॉटेल व्यावसायिक, बिर्यानी सेंटर, चायनिज सेंटर येथे अनधिकृत गॅस सिलेंडरचा वापर

गुहागर : तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी येथील बाजारपेठेत हॉटेल व्यावसायिक, बिर्याणी सेंटर, चायनिज सेंटर, पाणीपुरी, भेळपुरी सेंटर येथे काही ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरण्यात येतात. तसेच बालकामगारांची संख्याही दिसते. या सर्व प्रश्नांकडे अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले.
या हॉटेल व्यवसायिकांना, चायनिज सेंटरना त्यांना अशा प्रकारे अनधिकृत गॅस सिलेंडर कोण पुरवते, स्वयंपाकाला पाणी कोणते वापरले जाते, सांडपाण्याचा निचरा कुठे केला जातो, स्वच्छतागृह आहे का, बाल कामगार काम का करतात, स्वच्छता असते का, या सर्व बाबींकडे अन्न भेसळचे अधिकारी करत असल्याचा गंभीर आरोप करत बालकामगारांना कामासाठी खपवून घेतले जाते का आणि कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते का या सर्व प्रकरणाची चौकशी करून असे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर संबंधित अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे.



