रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन

अलिबाग (राजेश बाष्टे) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या वतीने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जिल्हा विधी सेवा मार्फत जे कार्यक्रम घेतले जातात, त्यांचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करताना आपले कार्यक्रम हे नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”
जिल्हा न्यायाधीश (क्र. २) श्रीमती सुनिता तिवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश श्रीमती तेजस्विनी निराळे अलिबाग, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ॲड. ए. डी. पाटील, एलइडीएसचे वकील, लीगल एड कर्मचारी, वकील वर्ग, पक्षकार इतर कमिटी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कायदेविषयक जनजागृती झाली पाहिजे आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरण हे नेहमी तत्पर असणार आहे, असे सांगतानाच अलिबाग बार असोसिएशनचे त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यक्रम हे सोशल मीडियावरून लोकांमार्फत पोहोचले पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी एलईडीएस असिस्टंट ॲड. निलोफर शेख यांनी “घरगुती हिंसाचार एक २००५ अंतर्गत पीडित महिलांना कायदेशीर मदत पुरविणे” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आदिवासी वाडीवर जाऊन अवरनेस प्रोग्राम घेऊन जनजागृती केली पाहिजे, असे सांगितले.
एलईडीएसचे असिस्टंट ॲड. पियुष गडे यांनी “एडीआर पद्धती आणि फायदे तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्य” या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “लोक न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही प्रकरणे येतात. लोकन्यायालयामध्ये लोकांचा पैसा वेळ हा वाचला जातो. नागरिकांचे मूलभूत मूलभूत कर्तव्यामध्ये घटनेचे पालन करणे देशाचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा न्यायाधीश (क्र. दोन) श्रीमती सुनिता तिवारी यांचे स्वागत जिल्हाविधी प्राधिकरण सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲड. तनुष्का पेडणेकर यांनी केले.



