मुख्य बातमी
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कार्यशाळा सोमवारी

रत्नागिरी : आरोग्य कुटुंब प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत येथील स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे सोमवारी (१६ मार्च) रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
या कार्याशाळेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक (भा.प्र.से.) उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.



