क्रीडामुख्य बातमी
रत्नागिरी औद्योगिक संस्थेतील गुरुप्रसाद सावंत यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने तेलंगणा तायक्वांदो असोसिएशन आयोजित खुल्या तायक्वांदो राज्य राष्ट्रीय स्पर्धा बालयोगी इंडो स्टेडियम गच्ची बोली हैदराबाद तेलंगणा येथे २५ ते २७ या कालावधीत होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत लो. बा. टी. औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे आर.ए.सी.८२ या विभागात प्रशिक्षण घेणारा गुरुप्रसाद मिलिंद सावंत याची या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे.
स्पर्धेत निवड झाल्याबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. कोतवडेकर, श्री. शिंदे, सौ. वसुधा पांचाळ, सौ. श्रद्धा जाधव, श्री. कांबळे, श्री. पडाळकर यांनी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.


