मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शृंगारतळी येथे समाज नेते, माजी आमदार रामभाऊ बेंडल यांचा स्मृतिदिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे नेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली सभा व कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शृंगारतळी येथील स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात ग्रामीणचे शाखा अध्यक्ष पांडुरंग गणपत पाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

रामभाऊ बेंडल यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि वार्षिक सभेला ग्रामीण तालुका शाखेचे पदाधिकारी, सल्लागार, कार्यकारिणीचे सदस्य तसेच गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट, तवसाळ गट आणि युवक मंडळ यांचे आजी – माजी सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीचे सदस्य, प्रमुख कार्यकर्ते तसेच गुहागर तालुक्यातील समाज बंधू आणि भगिनी यांनी बहुसंख्येने वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका गुहागर ग्रामीण शाखेचे सरचिटणीस प्रदीप गोविंद बेंडल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!