मुख्य बातमी

‘ऑफ्रोह’ रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर रोडे, तर सचिवपदी हेमराज सोनकुसरे यांची निवड

रत्नागिरी : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष पदी किशोर रोडे यांची, तर सचिवपदी हेमराज सोनकुसरे व सहसचिव म्हणून राजेश कुंभारे यांची निवड करण्यात आली आहे.

‘ऑफ्रोह’ व महिला आघाडी, रत्नागिरीची मासिक सभा ६ जुलै रोजी झाली. या सभेत ‘ऑफ्रोह’ रत्नागिरी कार्यकारिणीमध्ये संघटनात्मक बदल करणे व जाहीर करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार जिल्हाध्यक्षसह नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

‘ऑफ्रोह’ रत्नागिरीची नुतन कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष – किशोर रोडे, कार्याध्यक्ष – बापुराव रोडे, उपाध्यक्ष – नंदा राणे, सचिव – हेमराज सोनकुसरे, सहसचिव – राजेश कुंभारे, कोषाध्यक्ष – सतीश घावट, महिला संघटक – सौ. उषा पारशे. कार्यकारिणी सदस्य : सिंधु सनगळे, देवकीनंदन सपकाळे, पंडित सोनवणे, पंढरीनाथ पपुलवार, आकाश दांडगे, गजानन उमरेडकर, श्रीकृष्ण भांडे, पद्माकर पवार, प्रमोद सोनकुसरे, लता वडाळ.

‘ऑफ्रोह’चे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, महासचिव डाॅ. दीपक केदार, महिला आघाडी राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्ष प्रिया खापरे, भारती धुमाळ, प्रसिद्धीप्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. आशा पारशे, उपाध्यक्ष सुनंदा फुकट, सचिव स्वाती रोडे यांनी सर्व नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!