संस्कृत महोत्सवांतर्गत निःशुल्क गीता-वेदांत परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत येथील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या वतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने निःशुल्क सात दिवसीय गीता-वेदांत परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ४.४५ यावेळेत सोमवार ते शनिवार दरम्यान होईल.
या अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि भारतीय तत्त्वज्ञानातील महत्त्वपूर्ण संकल्पनांचा प्राथमिक परिचय दिला जाणार असून, सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
हा अभ्यासक्रम भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्टँड जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे. नोंदणीसाठी आणि अधिकच्या माहितीसाठी प्रा. अविनाश चव्हाण (८३९०८५४९२६) यांच्याशी संपर्क करावा. https://forms.gle/qcqPHuDqnQSm2Wda7 नाव नोंदणी साठी या लिंकचा वापर करावा.
हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून, तत्त्वज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि अभ्यासकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



