सावर्डे पंचक्रोशीतील शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश
राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे पंचक्रोशीतील शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेश करतांचे ना. राणे यांनी स्वागत करून भाजपा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.
खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे ‘आमचा देवा भाऊ’ या अभियानांतर्गत राख्यांचे संकलन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रामदास राणे, भाजपा महिला प्रदेश मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, गुहागर माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके, गुहागर मंडल अध्यक्ष अभय भाटकर, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषिकेश मोरे, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग, दापोली ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन होडबे, दापोली शहर अध्यक्षा सौ. जयाताई साळवी, मंडणगड अध्यक्ष प्रवीण कदम, आमचा देवाभाऊ राखी संकलन जिल्हा संयोजिका सौ. स्मिता जावकर, अपुर्वा बारगुडे, प्रांजळ कचरेकर, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, विनोद कदम, अभिजित सावर्डेकर, संदीप भिसे, चुकून अर्बन बँकेचे संचालक रत्नदीप देवळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सावर्डे पंचक्रोशीतील निलेश तोडकरी (कुडप), सोहम गुजर (डेरवण), सावर्डे येथील सुबोध चव्हाण, निखिल चव्हाण, प्रदीप होडे, सुधाकर चव्हाण, संतोष चव्हाण, साहिल गुरव, रोहन कदम, सचिन दांडेकर, विकास चव्हाण, निलेश शिर्के आधुनिक भाजपात प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे ना. नितेश राणे यांनी स्वागत करून भाजपा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली, तर पक्ष वाढीसाठी देखील मेहनत घ्या, असा सल्ला देखील ना. राणे यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागर माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले. तरी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


