मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

गुहागरमध्ये ५ जि.प. आणि १० पं.स.च्या निवडणुका स्वबळावर लढविणार

बळीराज सेनेचा ठाम निर्धार

आबलोली (संदेश कदम) : बळीराज सेनेची कोर कमिटीची महत्त्वाची बैठक गुहागर तालुक्यातील वरवेली येथे मनोहर घुमे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते यांच्यासह संपर्क प्रमुख मनोहर घुमे, प्रशांत भेकरे, अमित काताळे, तालुका प्रमुख अरुण भुवड, तालुका सचिव ॲड. दिनेश कदम, नवनिर्वाचित युवक तालुका अध्यक्ष विवेक जांगली, विभाग प्रमुख अशोक रावणंग, वरवेली शाखा प्रमुख नामदेव अवेरे, नवनिर्वाचित महिला तालुका अध्यक्ष सौ. श्रावणी शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. घुमे यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गुहागर तालुक्यात बळीराज सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी २० कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, असे जाहीर करून गुहागर विधानसभा मतदारसंघातील अनेक तरुण कार्यकर्त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात येईल, असे श्री. घुमे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!