पावस येथे ईद -ए- मिलादनिमित्त भव्य मिरवणूक

गावखडी : इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ईद-ए- मिलाद जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्ला पावस यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून यानिमित्त प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. त्यानिमित्त सजावट, विद्युत रोषणाई, मिरवणूक, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ईद -ए-मिलादनिमित्त जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्ला पावस च्या वतीने भव्य मिरवणूक हजरत शेख महंमद पीर दर्गा ते काझी मोहल्ला, दखनी मोहल्ल्यात फिरून जामा मस्जिद दखनी मोहल्ला मध्ये ईद-ए-मिलाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या दिवसाला मुस्लिम समाजात फार मोठे महत्त्व आहे.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष वसीम शौकत म्हालदार, रिजवान रोशनखान फडनाईक, दाऊद म्हामूद मुजावर, फैजल दाऊद झारी, ईकबाल अ. फडनाईक आदींनी परिश्रम घेतले. तसेच हा कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी पावस पोलीस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबल सोनाली शिंदे, पूर्णगड पोलीस ठाण्याचे महेश कुबडे आदी पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.



