मुख्य बातमी

आणि सुदैवाने तो बचावला…

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील घटना : दोन आरपीएफ आणि एक विक्रेत्याची सतर्कता 

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.चालत्या ट्रेन मधून बेजबाबदार पणे उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली जात होता.पण प्लॅटफॉर्म वर सेवेत असलेल्या दोन आरपीएफ आणि एक विक्रेत्याच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

आज सकाळी एलटीटी – सावंतवाडी सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दाखल झाली. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच यातील एक तरुणाने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेनच्या खाली येणार होता. पण तो पडताच प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आरपीएफ जवान आणि एका विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले.त्यामुळे त्याचे प्राण वाचले.कोकण रेल्वेचा आर पी एफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. त्याच्याबरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. प्लॅटफॉर्मवर कार्यरत दोन आर पी एफ व विक्रेत्यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळे केवळ त्याचे प्राण वाचले.

या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे. संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!