आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वेळणेश्वर येथे २८ एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आबलोली (संदेश कदम) : इंटरनॅशनल लॉंजेव्हिटी सेंटर इंडिया आयोजित व घराडा केमिकल्स लिमिटेड प्रायोजित, बाई रतनबाई घराडा हॉस्पिटल, लवेल आणि साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे वय ५५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या (२८ एप्रिल) सकाळी १० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्प, वेळणेश्वर, पिंपरी रोड, वदईच्या आधी, महावितरण सब स्टेशनच्या मागे होणार आहे.

हे शिबिर मोफत असून, यात तपासणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:चे आधारकार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो घेऊन यायचे यायचे आहेत. नावनोंदणी व भविष्यातील सवलतीमध्ये उपचारांसाठी अनिवार्य आहे. शिबिरात येण्यासाठी वेळणेश्वर पिंपर फाटा ते आश्रमपर्यंत मोफत वाहन सेवा ठेवण्यात आली आहे.

या शिबिरात रक्ततपासणी, ईसीजी, रक्तदाब व रक्तशर्करा तसेच रोग निदान मोफत केले जाणार असून पुढील चाचण्या व उपचारांवर सवलती आहेत. अधिक माहितीसाठी सुशांत (९५६१३२७८७३), नंदकुमार (७२७६६९५५४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!