मुख्य बातमी

निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा ७ जानेवारी रोजी

रत्नागिरी : जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या वतीने ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात सकाळी ११ ते १ या वेळेत निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येणारे निवृत्त वेतन व इतर लाभ देण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक, प्रतिनिधी यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!