मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आयटीआय दापोली आयएमसीसाठी तात्पुरत्या स्वरूपात लिपिक टंकलेखक पदासाठी ३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दापोली : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीच्या (आयएमसी) कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक नेमण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (शासकीय सुटटी वगळून) सादर करावेत, असे आयएमसी ऑफ आयटीआयचे (दापोली) सचिव एम. बी. गवई यांनी कळविले आहे.

या पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३८ वर्ष असून शैक्षणिक अर्हता पदवीधर, एमसीआयटी, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी असणे आवश्यक आहे. किमान दोन वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव व ऑनलाईन कामकाज हाताळण्याचे ज्ञान आवश्यक आहे. दरमहा १२ हजार रुपये मानधन देण्यात येईल. कार्यालयीन कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. नियुक्तीचा कालावधी ११ महिने राहिल व त्याबाबतचे बंधपत्र देणे अनिवार्य राहिल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी मिळेल. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. आपली सेवा असमाधानकारक असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सेवा समाप्त करण्यात येईल.

इच्छुकांनी सचिव, आयएमसी द्वारा शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था दापोली, मु. पो. जालगांव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ता.दापोली, जि. रत्नागिरी ४१५७१२ या संस्थेच्या पत्त्यावर अर्ज करावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!