मुख्य बातमी

क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत ९ डिसेंबर रोजी 

रत्नागिरी : पणजी येथील पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ९ डिसेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावरील ६४ वी डाक अदालत सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार १ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवण्याचे आवाहन रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.

पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र आदी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा या सर्व तपशीलासह केलेला असावा.

पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयामध्ये होत असलेल्या या डाक अदालतीत संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार सहायक डाक निदेशक १, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी ४०३००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह १ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नसल्याचे डाकघर अधीक्षक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!