मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर ट्रक- दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार

संगमेश्वर : ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर चिरे भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात आंबवली गावातील प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (१९ ऑगस्ट) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

या मार्गावर चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकची नियमितपणे मोठी वाहतूक सुरू असते. हे ट्रक कोणत्याही भीतीशिवाय अत्यंत वेगाने धावत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अपघात घडवलेला ट्रक (एमएच-०७-११७०) महसूल विभागातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा असल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्यांची कागदपत्रे, फिटनेस आणि अवाजवी वेग यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश उरलेला नाही.

दरम्यान, ताम्हने-कोसुंब रस्त्यावर आधीपासूनच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खराब रस्ते आणि भरधाव वाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!