मुख्य बातमी

गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात पंचरात्रौत्सवनिमित्त विविध कार्यक्रम 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रतिवर्षी नवरात्रौत्सवादरम्यान ललिता पंचमी ते महानवमी असा पाच दिवसांचा श्री भगवती आणि परब्रम्ह श्री स्वामी समर्थ देव यांचा पंचरात्रौत्सव सोहळा साजरा करण्यात येतो.

श्री स्वामी देव व श्री गुरुदेव दास दिगंबर स्वामी यांच्या कृपेने होणारा हा सोहळा यावर्षी १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या पंचरात्रौत्सव सोहळ्यामधे पहिल्या दिवशी श्री ललिता देवी पूजन, दुसऱ्या दिवशी षष्ठी देवी पूजन, तिसऱ्या दिवशी श्री महालक्ष्मी पूजन, चौथ्या दिवशी श्री दुर्गादेवी पूजन आणि पाचव्या दिवशी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली पूजन अशाप्रकारे कलश स्थापन करून पूजन होईल.

कलश पूजनाला बसून पूजनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तगणांनी आपली नांवे त्वरीत मठामध्ये नोंदवावीत. या कार्यक्रमाचा भाविक भक्तगण यांनी लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!